Header Ads

ad

Live: पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. जाणून घ्या लाइव्ह अपडेट्स: MLC Election Results Live Updates: >> धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपच्या अमरीश पटेल यांचा विजय. पटेल यांना ४३४ पैकी ३३२ मते, तर काँग्रेसच्या अभिजित पाटील यांना अवघी ९८ मते >> औरंगाबाद येथे मतमोजणी सुरू झाली तेव्हाचे दृश्य >> पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात.. >> नागपूर पदवीधर मतमोजणीस प्रारंभ, टपाल मतांची मोजणी सुरू >> थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; १९ उमेदवारांच्या भवितव्याचा होणार फैसला >> बंडखोरीमुळे गाजलेल्या मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपची कसोटी >> महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर झालेली पहिलीच मोठी निवडणूक. निकालाकडे राज्याचे लक्ष >> तीन पदवीधर, दोन शिक्षक व एका स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी मंगळवारी झाले होते मतदान >> विधान परिषदेतील सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा आज निकाल


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3myyzwd

No comments