Header Ads

ad

ठाकरे सरकारसाठी प्रार्थना करत मनसेचे गांधीजींना अभिवादन

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आज त्यांना अभिवादन केलं जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गांधी जयंतीचं औचित्य साधून मुख्यमंत्री यांचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या एका आश्वासनाची आठवण देत राज्यातील ठाकरे सरकारला सन्मती देण्याची मागणी देवाकडे केली आहे. वाचा: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांनी जनेतवर आश्वासनांची खैरात केली होती. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेला टोलचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. राज्यात शिवसेनेचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. वाचा: मनसेचे सरचिटणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा तो व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यासोबत देशपांडे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध प्रार्थनेत एका शब्दाचा बदल करून राज्य सरकारला टोला हाणला आहे. 'रघुपती राघव राजाराम... पतित पावन सीताराम... सरकार को सन्मती दे भगवान' असं त्यांनी म्हटलं आहे. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन, असंही त्यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nbogPy

No comments