Header Ads

ad

Live: पुण्यात रात्रभर पावसाने उडवला हाहा:कार

पुणे: रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि परिसरात हाहा:कार उडवून दिला. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले. मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. पद्मावती परिसरात आंबिल ओढ्याची सीमा भिंत कोसळल्याने काही सोसायट्यांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी शिरले. त्याबरोबरच तावरे कॉलनी, सहकारनगर, लक्ष्मीनगर, दांडेकर पूल वसाहत या भागांमध्ये पाणी शिरले असून जवळपास निम्मे शहर जलमय झाले. पोलिस व अग्निशामक विभागाच्या जवानांनी नागरिकांची सुटका करण्यासाठी धाव घेतली आहे. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे... Live updates: >> अरण्येश्वर टांगेवाले कॉलनी येथील छायाचित्र. >> चिमटा वस्तीत पाण्यात अडकलेल्या सर्व नागरिकांना जवळील सेंट पॅट्रिक चर्च येथे आणले. >> हवामान विभागाच्या कार्यालयाच्या आवारातही भरले पाणी >> अरणेश्वर, टांगेवाले कॉलनी भागात ५ मृतदेह सापडले. ३ ते ४ वाहून गेल्याची शक्यता. अग्निशमन दलाने दिली माहिती. >> पुरंदर तालुक्यात अतिवृष्टी. नाझरे धरणातून सुमारे दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. >> चिमटा वस्ती भागात अंदाजे ५०० लोक अडकले. लष्कराच्या दक्षिण कमांडला बारा वाजता मिळाली माहिती. >> रेसकोर्स जवळील चिमटा वस्ती भागात अनेक घरे पाण्याखाली. लष्कराच्या दक्षिण कमांडच्या जवानांकडून बचावकार्य. >> सिंहगड रस्त्यावर एका बाजूने वाहतूक सुरू >> सिंहगड रस्त्यावर हिंगणे खुर्द येथे पाण्याचा प्रचंड लोंढा. >> कात्रज येथे डीमार्टजवळ महामार्गावर पाणी भरले. >> धायरी पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. वाहने पाण्यात अनेकजण गाड्यांमध्ये अडकले आहेत. >> कोथरूड कर्वे पुतळ्या जवळ ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर. >> पावसामुळे आयटीनगरी खोळंबली; हिंजवडीत प्रचंड वाहतूक कोंडी. >> नारायण पेठ मोदी गणपती रस्ता येथे विविध सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. >> सिंहगड रस्ता, हिंगणे प्रचिती हॉस्पिटलजवळची सगळी दुकाने पाण्याखाली अफवांवर विश्वास ठेवू नका: महापौरपुणे शहर व परिसरात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. आम्ही महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याच बरोबर कुणाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे. >> दांडेकर वस्ती, आंबील ओढा परिसरातील घरांत पाणी शिरल्यामुळे तेथील रहिवाशांना राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले कला मंदिरात हलविण्यात आले. >> कात्रजमधील नवले हॉस्पिटल परिसर जलमय. >> पुणे-सातारा मार्गावर वेळू गावच्या हद्दीत पूरसदृष्य स्थिती.ओम्नी कार वाहून गेली. जीवितहानी नाही. >> अरण्येश्वर मंदिर परिसरात भरले पाणी >> किरकटवाडी मधुबन सोसायटीत जवळच्या ओढ्याचे पाणी घुसले


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2lNSX2r

No comments