Header Ads

ad

Live: राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत प्रथमच एक हजारांची वाढ

मुंबई: राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी १००८ बाधितांची वाढ झाली असून एकूण संख्या आता ११५०६ झाली आहे. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत १८७९ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: >> औरंगाबाद: जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये शेतीनियमित मालाची आवक घटली. शनिवारी सरासरीपेक्षा २० टक्के भाजीपाल्याची आवक. माल विक्रीसाठी येणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांची संख्याही झाली कमी. >> राज्यात आतापर्यंत १८७९ रुग्णांवर यशस्वी उपचार >> राज्यातील करोना रुग्णांमध्ये प्रथमच मोठी वाढ; एका दिवसात १००८ नव्या रुग्णांची नोंद


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d6lHID

No comments