कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आग; करोना रुग्ण थोडक्यात बचावले
कोल्हापूर: येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आज सकाळी लागलेल्या आगीत दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचं सांगण्यात येतं. सीपीआरमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. आग लागताच सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मात्र, या सगळ्या धावपळीत दोन सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. आगीमुळं रुग्णालयात मोठी खळबळ उडाली होती. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीने तेथे धाव घेऊन पाहणी केली व संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. वाचा: ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १५ रुग्ण उपचार घेत होते. आगीमुळं कुणीही मृत झालेले नाही. मात्र, तेथून सर्व रुग्ण हलवल्यानंतर तिघांचा मृत्यू झाला. हे सर्व पॉझिटिव्ह रुग्ण होते. भीतीने अथवा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33al4vI
Post a Comment