अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात
मुंबई: थकवा व अंगात कणकण असल्यानं दोन दिवसांपूर्वी होम क्वारंटाइन झालेले उपमुख्यमंत्री यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. करोनाच्या काळातही अजित पवार यांचा कामाचा धडाका सुरू होता. लॉकडाऊनच्या काळातही मंत्रालयात त्यांची उपस्थिती असायची. ते बैठका घेत होते. मात्र, करोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजी घेत होते. अलीकडेच त्यांनी तिवृष्टग्रस्त भागांचा दौरा केला होता. तो दौरा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी करोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्यालाही त्यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. 'देवगिरी' निवासस्थानातूनच ते दैनंदिन शासकीय कामकाज करत होते. वाचा: अजित पवारांना करोनाची लागण झाल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ती फेटाळली होती. केवळ खबरदारी म्हणून घरात थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचं पार्थ म्हणाले होते. मात्र, आता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3olCAFP
Post a Comment