Header Ads

ad

प्रेयसीवर अॅसिड टाकले, मग पेट्रोल ओतून पेटवले; बीडमध्ये खळबळ

बीड: नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावर येलंबघाट येथे ही घटना घडली. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( by partner, dies) नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील अविनाश राजूरे याचे गावातील एका २२ वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघेही पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळी निमित्त शनिवारी हे दोघेही दुचाकीने पुण्याहून गावाकडे निघाले होते. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातील येलंबघाट जवळ अविनाशनं दुचारी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्यात नेऊन तिच्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तो तिथून पसार झाला. वाचा: तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, पहाटेची वेळ असल्यानं कुणीही मदतीला येऊ शकले नाही. मोठ्या प्रमाणावर भाजलेली ही तरुणी तब्बल १२ तास रस्त्यालगत पडून होती. दुपारी तीनच्या सुमारास एका वाहनधारकाला तिचा आवाज ऐकू आला. त्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जखमी तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2H2egI6

No comments