Header Ads

ad

भाजप नेते आशिष शेलार यांना केंद्राकडून नवी जबाबदारी

मुंबईः नेते यांना पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशिष शेलार यांची हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच भाजपनं राज्य प्रभारींची नव्या टीमची यादी जाहीर केलीय. या टीममध्ये अनेक नावं जुने आहेत परंतु, काही नवीन नावं अनेकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहेत. त्यानंतर आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी राष्ट्रीय यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर, कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, महाराष्ट्रातील नेते आशिष शेलार, गुजरातचे नेते प्रदीप सिंह वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना भाजपनं राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे. या दोघांचीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातून विजया रहाटकर व सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38H6wXz

No comments