Header Ads

ad

पुणे हादरले! चौकात भरदिवसा चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवून दोघे पसार

पुणे: पुण्यातील परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह आणून येथील लोहिया उद्यानासमोर टाकण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एक टेम्पो आला. या टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह दोघांनी बाहेर काढला. त्यानंतर उद्यानासमोर तो फेकून दोघे जण पसार झाले. उद्यानाजवळील नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांना धक्काच बसला. नेमके चादरीत काय गुंडाळून फेकून दिले आहे, या भीतीने काही नागरिक तेथून पळून गेले. भरदिवसा घडलेला या भयानक प्रकाराने परिसरात खळबळ माजली. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना कळवले. चादरीत मृतदेह गुंडाळून तो फेकून दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38PvnH8

No comments