Header Ads

ad

Bhandara Fire Live: मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागात (SNCU) लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसंबंधीच्या सर्व घडामोडींवर एक नजर: लाइव्ह अपडेट्स: >> मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत देण्याची देवेंद्र फडणवीस यांची मागणी >> सरकार दोषींवर कारवाई करेल; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला विश्वास >> भंडारा दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट. मृतांच्या कुटुंबीयांबाबत व्यक्त केल्या सहवेदना. >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील व्यक्त केले दु:ख >> प्रगतीशील महाराष्ट्रात रुग्णालयातील आयसीयूमध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू व्हावा यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही - फडणवीस >> आगीच्या दुर्घटनेची चौकशी करून दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी >> आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप >> आरोग्यमंत्री आज संध्याकाळी रुग्णालयाला भेट देण्याची शक्यता >> राज्यातील सर्व रुग्णालयांतील शिशू केअर युनिटच्या ऑडिटचे आदेश >> मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर >> मृत बालकांपैकी सात जणांचा धुरात गुदमरून तर तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती >> मुख्यमंत्री यांनी आगीच्या दुर्घटनेबद्दल व्यक्त केलं तीव्र दु:ख. उच्चस्तरीय चौकशीचे दिले आदेश >> शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर >> भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात बालक दक्षता विभागात आग; दहा बालकांचा मृत्यू


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q3WDZc

No comments