जिथे खाऊ, तिथे जाऊ... गिते, बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावर मनसेची टीका
मुंबई: माजी आमदार व नाशिकमधील स्थानिक नेते यांनी शुक्रवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना-मनसे-भाजप आणि पुन्हा शिवसेना असा प्रवास करणाऱ्या या नेत्यांनी यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या काही नेत्यांवर टीका केली होती. मनसेचे नेते यांनी त्यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. ( criticises , ) 'खाऊ तिथे आम्ही जाऊ' अशा शीर्षकाची पोस्ट फेसबुकवर लिहून बाळा नांदगावकर यांनी गिते व बागुल यांच्यावर तोफ डागली आहे. आपल्या पोस्टमध्ये नांदगावकर म्हणतात, 'दोन दिवसांपूर्वी येथील काही 'अतिशय मोठे' नेते बोलले की नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच 'मोठे नेते' आहेत, ज्यांनी मनसेची चलती असताना शिवसेना सोडली, भाजपची सत्ता असताना मनसे सोडली, शिवसेनेची सत्ता असताना पुन्हा भाजप सोडला. एवढ्या "निष्ठावंत" नेत्यांवर काय बोलणार? 'जिथे भेळ तिथे खेळ' अशा प्रकारचं त्यांचं राजकारण आहे. ते त्यांनाच लखलाभ असो.' वाचा: 'राजकीय जीवनात असताना वैयक्तिक शेरेबाजी करणं शक्यतो मी कायमच टाळत आलो आहे, परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाहीत म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते,' असंही त्यांनी म्हटलं आहे. 'गेल्या घरी सुखी राहा, अशा शुभेच्छा व मैत्रीपूर्ण सल्लाही नांदगावकर यांनी गिते व बागुल यांना दिला आहे. वसंत गिते व सुनील बागुल हे मूळचे शिवसैनिक. मनसेची स्थापना झाल्यानंतर गिते यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते आमदार म्हणूनही निवडून आले. मात्र, मनसेचा राजकीय जोर ओसरताच त्यांनी भाजपला जवळ केले. पाठोपाठ सुनील बागुलही भाजपमध्ये गेले. तिथं त्यांना सुरुवातीला पक्षपातळीवर पदंही देण्यात आली. मात्र, भाजपमध्ये फारसे भवितव्य नसल्याचं लक्षात येताच त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LjZ6jv
Post a Comment