दरोड्यासाठी आलेल्या चोरट्याचा मोबाइल घरात पडला आणि...
कल्याण: निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्याच्या मुलीने उधळून लावला. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत पकडून ठेवलेले असतानाही या मुलीने प्रतिकार करत आरडाओरडा करत शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. यामुळे दरोडेखोरांना हाती लागलेली अडीच हजाराची रोकड आणि मोबाईल फोन घेऊन पळावे लागले. मात्र, या झटापटीत चोरट्याचा मोबाईल घरात पडल्याने या मोबाईलद्वारे चोरट्याचा माग काढत पोलिसानी १२ तासांत त्याला ठाण्यातून अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्याच इमारतीत राहणाऱ्या तरुणाला पोलिसानी अटक केली असून आणखी एक महिला आरोपी फरार असून तिचा पोलीस शोध घेत आहेत. वाचा: पश्चिमेकडील इमारतीत राहतात. अपंग असलेल्या गिरी यांची पत्नी आणि मुलगी मंगळवारी ५ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडताच दबा धरून बसलेल्या ३ दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. पाठमोऱ्या बसलेल्या गिरी यांना काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांचे हात खुर्चीला बांधले व तोंडावर पट्टी चिकटवली. नंतर घरात शोधाशोध सुरू केली. इतक्यात त्यांची मुलगी घरात आली. दरोडेखोरांनी दरवाजातच तिला पकडून तिच्या तोंडाला पट्टी बांधून तिचे हात बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुलीने आरडाओरडा केला. आवाजाने शेजारी धावत आल्याने दरोडेखोरांचा प्लान फसला. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी पळ काढला. मात्र मुलीबरोबर झालेल्या झटापटीत चोरट्यांच्या हातातून पडलेला फोन पोलिसांच्या हाती लागला. या फोनवरून पोलिसांनी माग काढत ठाण्यातून एका आरोपीला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून, गिरी यांच्या इमारतीत राहणाऱ्या एका तरुणाने हा दरोड्याचा प्लान आखल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला देखील अटक केली असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र फारशी रक्कम किंवा दागिने चोरीला न गेल्याने दरोड्याचा उद्देश नेमका काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35mvh8I
Post a Comment