Header Ads

ad

पुण्यात नाइट कर्फ्यू वाढवला; 'हे' आहेत नवे नियम

पुणेः करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तसंच, रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यातील रात्रीची संचारबंदी १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लास बंद राहणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर महोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्यानं खबदारी म्हणून महाविद्यालये आणि कोचिंग क्लास १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून या काळात ऑनलाइन शिक्षणास परवानगी असेल. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचार निर्बंध कायम असणार आहेत. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर, अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे, असंही महापौरांनी सांगितलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2MweTMO

No comments