Header Ads

ad

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना करोनाची लागण

बीडः भाजपच्या नेत्या यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पंकजा मुंडे यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरु आहेत. राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. राज्यात दररोज ६० हजारांच्या संख्येनं रुग्ण सापडत आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशातच राज्यातील लोकप्रतिनिधींनाही आता करोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. पंकजा मुंडे यांनीही एक ट्वीट करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'माझा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून विलगीकरणात होते. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळं मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यात वेळी कदाचित मला करोनाचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळं या काळात जे कोणी माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी स्वतःची करोना चाचणी करुन घ्यावी,' असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही करोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळं त्या घरीच उपचार घेत होत्या. २४ तासांत ९८५ रुग्ण दगावले महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात ६३ हजार ३०९ इतक्या करोनारुग्णांची भर पडली, तर ६१ हजार १८१ करोनाबाधित बरे झाले. मात्र, या काळात राज्यात ९८५ करोना बाधितांचा मृत्यू झाला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QJcm3T

No comments