Header Ads

ad

मुंब्रा येथील प्राइम हॉस्पिटलला आग; चार जणांचा होरपळून मृत्यू

ठाणे: संपूर्ण राज्य करोनाच्या संकटाशी झुंजत असताना दुसरीकडे अपघातांची मालिका सुरूच आहे. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये घडलेल्या दुर्घटनांनंतर आता जिल्ह्यातही अशाच प्रकारची दुर्घटना घडली आहे. येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Fire at in , ) पहाटे पावणे चारच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं तातडीनं हालचाल करून रुग्णांना बाहेर काढले. रुग्णांना इतरत्र हलवताना चार जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे. आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32XgO1D

No comments