शरद पवार यांची प्रकृती स्थिर; आज मिळणार डिस्चार्ज
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी ही माहिती दिली आहे. पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयातील खडे हे त्यांच्या पोटदुखीचं कारण असल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. आता प्रकृती स्थिर असल्यानं त्यांना घरी सोडलं जाणार आहे. वाचा: नवाब मलिक यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. 'ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमनं आज शरद पवारांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांनंतर पुन्हा एकदा त्यांची तपासणी केली जाईल. त्याची प्रकृती उत्तम असल्यास त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाईल,' अशी माहिती मलिक यांनी दिली आहे. 'पवार साहेबांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असल्यानं त्यांच्या भेटीस जाण्याचं टाळावं, असं आवाहन नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना केलं आहे. वाचा: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत ट्वीट केलं आहे. 'महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. पवार साहेब फिट अँड फाईन आहेत,' असं त्यांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rNEMGo
Post a Comment