Jalna : लॉकडाउनमध्ये स्नॅक्स सेंटर बंद; आर्थिक चणचणीमुळे त्याने केली आत्महत्या
जालना: लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहत आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्नॅक्स सेंटर चालवणाऱ्याने आर्थिक चणचणीला वैतागून गळफास घेऊन केली. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रमेश रामकिसन गुरुभैय्ये (रा. नूतन वसाहत) न्यू लक्ष्मी नाष्टा सेंटर चालवत. लॉकडाउनमुळे सेंटर बंद पडले. भासू लागल्याने ते नैराश्येत गेले. यातून त्यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली, असे सांगितले जाते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ewD73D
Post a Comment