Header Ads

ad

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळं खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन अज्ञात इसमानं केल्यामुळं खळबळ उडाली आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास मंत्रालयातील आपत्कालीन कक्षामध्ये फोन करून उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. (Bomb Threat at ) या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परिसराची व इमारतीची कसून तपासणी सुरू आहे. हा अफवा पसरवण्याचा प्रकार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vzxjNT

No comments