अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील!; अजित पवार यांचा थेट इशारा
पुणे: संसर्गाचा धोका कायम असताना व केंद्राकडून आगामी सणांच्या काळात लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या असताना उपमुख्यमंत्री यांनी आज यावर महत्त्वाचे विधान केले आहे. नियमांबाबत अजित पवार यांनी अगदी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. ( Ajit Pawar On ) वाचा: 'केरळ राज्यात निर्बंध कमी केल्याने तेथे मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडले. अलीकडेच एक सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यामुळे तेथे बाधितांची संख्या वाढली असून परत निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात गोपाळकाला, , नवरात्र, दिवाळी असे मोठे सण आता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सण साजरे करताना काळजी घ्यावी. अन्यथा पुन्हा निर्बंध लावावे लागतील', असा इशारा अजित पवार यांनी दिला. करोनाचे सावट अद्याप कायम असल्याने नागरिकांनी दहीहंडी ते दिवाळी या सर्व सणांमध्ये करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. वाचा: दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून सावध केले आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहेत ते कौतुकास्पद आहेत. दैनंदिन नवीन करोना बाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरापासून राज्यात घट पाहायला मिळत आहे मात्र, काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिक खबरदारी घ्यावी लागेल. येत्या काळात दहीहंडी आणि गणेशोत्सव यासारखे मोठे सण आहेत. या सणांच्या काळात गर्दी होण्याची शक्यता आहे. कोविडचा धोका पाहता ही गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्बंध लावण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी या पत्रात केली आहे. त्याआधी रात्रीची संचारबंदी लावण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज स्पष्ट इशाराच दिला आहे. अनिल देशमुख प्रकरणी म्हणाले... माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) क्लीनचिट मिळाली अशा काही बातम्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याबाबत मी वाचले आहे. अनेक चौकशा होत असतात. त्या-त्या वेळी सगळेजण चौकशीसाठी सहकार्य करत असतात. मात्र, देशमुख यांच्याबाबत जोपर्यंत मला अहवाल मिळत नाही. तोपर्यंत मी यावर काहीही बोलणार नाही, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zvDgh4
Post a Comment