Header Ads

ad

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले ५० हजार रुपये; कारण...

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्री कोविड सहाय्यता निधीमध्ये अखेर ५० हजार रुपये इतकी रक्कम जमा केली आहे. याबाबत सिंग यांचे वकील अनुकूल सेठ यांनी माहिती दिली. राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगासमोर हजर न झाल्याने सिंग यांना दंड ठोठावण्यात आला होता व दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार ही रक्कम भरण्यात आली आहे. ( ) वाचा: यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर असताना याला दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करणारे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री यांना लिहिले होते. या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ३० मार्च रोजी हायकोर्टाचे यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीसमोर म्हणणे मांडण्यासाठी परमबीर सिंग हे एकदाही हजर राहिलेले नाहीत. त्यामुळेच त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. वाचा: परमबीर सिंग यांनी त्यांच्याविरुद्धच्या चौकशीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. ही बाब लक्षात घेत चौकशी आयोगाने आपली सुनावणी ७ सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवली आहे. त्याचवेळी ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला परमबीर यांनी प्रत्यक्ष हजर राहावे, अन्यथा आणखी कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आयोगाने सांगितल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान, चांदिवाल आयोगाने आतापर्यंत तीनवेळा हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यात दोन वेळा सिंग हजर राहिले नाहीत तर तिसऱ्या सुनावणीला त्यांचे वकील सुनावणीला हजर राहिले. जून महिन्यात आयोगाने सर्वप्रथम सिंग यांना ५ हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले होते. ती रक्कम त्यांनी भरली नाही. त्यानंतर पुढच्या सुनावणीवेळी दंडाची रक्कम २५ हजार तर नंतर ५० हजार करण्यात आली. आयोगाचा हा आदेश मानत अखेर सिंग यांनी आता ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. वाचा :


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mKv6ha

No comments