... तर हजारो कार्यकर्ते पंचगंगेत जीव देतील; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
म. टा. प्रतिनिधी कोल्हापूरः 'आम्ही सरकारकडे चंद्र, सूर्य, तारे मागत नाही, आम्ही पूरग्रस्तांसाठी किरकोळ मदत मागत आहोत, सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, मग मंत्र्यांची दालने सजवायला, नवीन गाड्या घ्यायला, साखर कारखान्यांना बँक हमी द्यायला कुठून पैसे येतात?,' असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. तेव्हा राजू शेट्टी माध्यमांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याच सरकारविरोधात जोरदार टीका केली आहे. वाचाः ते म्हणाले, 'सरकारच्या नुसत्या घोषणावर आमचा विश्वास नाही. महापुरामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. त्याला आता सरकारच्या मदतीची गरज आहे. सव्वा महिना झाला तरी अजूनही मदत मिळाली नाही. आम्हाला संयम बाळगा अशी विनंती मंत्री महोदय करत आहेत. पण आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, आम्हाला संयम बाळगा म्हणण्याऐवजी आमच्या मागण्या तातडीने मान्य करा आणि शेतकऱ्यांना मदत करा,' असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले. वाचाः शेट्टी म्हणाले, 'पाच दिवस चालणाऱ्या या परिक्रमामध्ये मी वाहनाला स्पर्शही करणार नाही. माझ्याबरोबर सर्वांनी पाच दिवस पंचगंगा नदीच्या काठावरून चालत जायचे आहे. पाच दिवसात सरकारने ठोस निर्णय जाहीर केला नाही तर पाच सप्टेंबर रोजी हजारो कार्यकर्ते पंचगंगा नदीत बुडून जीव देतील,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WDVT3Q
Post a Comment