राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
मुंबईः करोना रुग्णांची वाढती संख्या, राजकीय कार्यक्रमातील वाढती गर्दी, सणांबाबत नियमावली यासारख्या अनेक प्रश्नांबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच, काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात () लावण्यासंदर्भात संकेत दिले होते. त्यावरही आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (maharashtra cabinet meeting) आज दुपारी १२. ३०च्या सुमारास राज्यात निर्बंध शिथील केल्यानंतर काही भागांत राज्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर, राज्यात येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्र असे अनेक सण आहेत. त्या सण समारंभात गर्दीमुळं करोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं सणांबाबत नियमावली तयार करण्याच्या सूचना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. वाचाः रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला करोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना तीनच दिवसांपूर्वी केली होती. याबाबत राज्य सरकार विचार करत असून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नाइट कर्फ्यू लागणार असल्याची शक्यता आहे. त्याबाबत आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. वाचाः राजकीय कार्यक्रमात होणारी गर्दी करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळं राजकीय कार्यक्रमांबाबत काहीतरी ठोस निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kIRswJ
Post a Comment