हे कसं शक्य आहे? अमरावतीत जिथे पाहाल तिथे दिसेल गोगलगाय, शेतकऱ्यांच्या पिकांचीही नासाडी
अमरावती : 'गोगलगाय आणि पोटात पाय' ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता हीच गोगलगाय (शंखी) शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अचलपूर, चांदुर बाजारसह जिल्ह्यातील अनेक परिसरात गोगलगाय मोठ्या प्रमाणात आढळत असून तिचा वावर शेतक-यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. संत्रा, सोयाबीन, कपाशी, केळी आदी पिक शंखी गोगलगायने उध्वस्त केले आहे. तिचा बंदोबस्त करणेही कठीण असून औषधी फवारणीला ती जुमानत नसल्याने सारेच हतबल झाले आहेत. ( in amravati even the destruction of ) तीन-चार वर्षापासून शेतकऱ्यांच्या नशिबाला चिकटलेल्या गोगलगायीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांचे पथक आले. शेतकऱ्यांसमक्ष प्रात्यक्षीके झाली. मात्र, गोगलगायीला शेताबाहेर काढण्यासाठी मंदीत शेतकऱ्यांच्या खिशाला चुना लागत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. कधी न दिसणारी गोगलगाय पावसाळ्यात मात्र रस्त्यावर माळावर, शेतात मुक्त संचार करते. संचार करण्याइतका चंचलपणा तिच्यात नसलातरी तिचे अस्तित्व व रात्री तिच्या हालचाली बघणाऱ्याला डोक्यावर हात ठेवण्यास भाग पाडणाऱ्या आहेत. परिसरात सध्या गोगलगायींचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या गोगलगायींनी धुमाकूळ घातला आहे. अतिशय संथ वृत्तीची ही गोगलगाय असली तरी शेतकरीवर्गासाठी मोठी धोकादायक आहे. पावसाळ्याव्यतिरिक्तसुद्धा ती इतर ऋतूंमध्ये कॅनल, जलयुक्त शिवार बंधारे, नाले, तलावात, नदीतही आढळून येते. चांदुरबाजार व अचलपूर तालुका परिसरातील संत्रा, सोयाबीन, कपाशी, केळी आदी पिक शंखी गोगलगायने उध्वस्त केले आहे. गोगलगाय एका जागी निपचित पडली की तिथेच चिकटून बसते. या निरूपयोगी प्राण्यांचा उपद्रव वाढला असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. परिसरातील अनेक शेतक-यांनी ही व्यथा व्यक्त केली आहे. (snails attack in amravati even the destruction of farmers crops) (snails attack in amravati even the destruction of farmers crops)
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ilCTim
Post a Comment