Header Ads

ad

'दोन पक्षांकडून संकेत; महाराष्ट्रात केव्हाही निवडणुका लागू शकतात'

मावळ: सरकारमधील तीन पक्षांमध्ये ज्या कुरबुरी सुरू आहेत त्याकडे बोट दाखवत नेते आणि आमदार यांनी सरकारचं भवितव्य आणि विधानसभा निवडणुकांबाबत खूप मोठे विधान केले आहे. ( ) वाचा: आशिष शेलार हे मावळ दौऱ्यावर असून कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शेलार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असाच एकप्रकारे दावा केला. 'राज्य सरकारमधील तीन पैकी दोन पक्षांकडून जे संकेत मिळत आहेत ते लक्षात घेतल्यास आणि एकंदर परिस्थितीचा अभ्यास केल्यास अनुमान असा निघतो की राज्यात निवडणूक केव्हाही लागू शकते', असे विधान शेलार यांनी केले. वाचा: शेलार यांनी सत्तेतील तिन्ही पक्षांवर तोफ डागली. 'हे तीन पक्षांचं सरकार घोटाळेबाज, झोलबाद आणि दगाबाज आहे. हा पक्ष तर आता भुरटा बनला आहे. जे मिळेल ते पदरात पाडून घेतात. शिवसेना दगाबाज आहे. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांच्या नावाने मते मागून नंतर आमच्याशी दगाबाजी केली. दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवल्यावर विकासाची कामे तरी प्रामाणिकपणे करतील असे वाटले होते पण तसं काहीच दिसत नाही,' अशी बोचरी टीका शेलार यांनी केली. वाचा: राज्य दलालांच्या हाती गेलं आहे. अनेक खाती दलाल चालवत आहेत. त्यामुळेच आयकर विभागाच्या कारवाया सुरू आहेत. गेले सात दिवस काय काय सुरू आहे हे तुम्ही पाहतच आहात, असे नमूद करत माझ्या नादाला लागू नका, इशाराही शेलार यांनी दिला. डोंबिवली व साकीनाका येथील बलात्काराच्या घटनांचा उल्लेख करत पोलिसांचा गुन्हेगारांना धाकच उरला नसल्याचे शेलार म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y43GIL

No comments