एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या
शेवगावः राज्यातील विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केला असतानाच जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेवगाव येथे परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. सरकारच्या धोरणावर कर्मचारी नाराज असल्याने संपाची हाक दिली आहे. त्यातच आज शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. दिलीप काकडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. (सविस्तर वृत्त लवकरच) वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pRe1DI
Post a Comment