मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, भर रस्त्यात केमिकलच्या टँकरला भीषण आग
चिपळूण : चिपळूण तालुक्यात कामथे घाटात केमिकलच्या टँकरला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. कामथे धरण परिसरात ही आग लागली असून यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर सध्या लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यात वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या जागीच थांबल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जात असलेल्या केमिकल टँकरने पेट घेतला. अचानक आग लागून आगीचे लोळ परिसरात दिसत आहेत. काळ्या धुराच्या लोळाने परिसरात प्रवाशांमध्येही भीती आहे. अधिक माहितीनुसार, अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GDfjbp
Post a Comment