तुळजापुरात दोन तरुणांकडे गावठी पिस्तुल सापडले, पोलिसांकडून बेड्या
रहिम शेख, उस्मानाबाद : तुळजापुर येथील दोन तरुणांकडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोघांनाही तुळजापुर पोलिसांनी अटक केली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातील एकजण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तुळजापूरच्या पाचुंदा तलावाजवळ दोन तरुणांकडे गावठी पिस्तुल असल्याची गुप्त माहिती तुळजापुर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाचुंदा तलावाकडे पंचासह जाऊन झडती घेतली. तेव्हा या दोघांकडे गावठी पिस्तुल आढळून आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. तसेच या दोघांनी तूळजापुर येथे गावठी पिस्तुल विक्री केली आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस उपाधीक्षक डॉ. सई भोरे पाटील आणि पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eSkec5
Post a Comment