कोल्हापुरात काँग्रेसवर आघात; आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
म. टा. प्रतिनिधी । कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार यांचे मध्यरात्री दोन वाजता दुःखद निधन झाले. त्याच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रथमच निवडणूक लढवली होती. उद्योजक म्हणून कोल्हापूरला परिचित असलेले जाधव हे अनेक फुटबॉल संघाचे आधारस्तंभ होते. अण्णा या नावाने ते शहरात अधिक परिचित होते. दोन वर्षे कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. वर्षभरापूर्वी त्यांना करोनाची बाधा झाली होती. करोना नंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. चार दिवसापूर्वी हैदराबाद येथे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. मध्यरात्री त्यांचे निधन झाले. दुपारी एक वाजता त्यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ddpXbA
Post a Comment