तुर्भे एमआयडीसीत BMW वर्कशॉपला आग, ४०-४५ कार आगीच्या भक्ष्यस्थानी, PHOTO बघा...
नवी मुंबई: एमआयडीसीत भूखंड क्रमांक डी- २०७ येथील बीएमडब्ल्यू वर्कशॉपमध्ये मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीत जवळपास ४० ते ४५ बीएमडब्ल्यू कार जळून खाक झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे प्रमाण मोठे असल्याने एमआयडीसीसह कोपरखैरणे, नेरूळ व शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. या आगीत बीएमडब्ल्यू वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर व कागदपत्रे देखील जळून खाक झाली आहेत. तुर्भे पोलीस ठाणे येथे या आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अग्निशमन दलाकडून या आगीबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल, असे तुर्भे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/305M0xL
Post a Comment