Header Ads

ad

Breaking : पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण; कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांची राज्याची करोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. तर अनेक नेत्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहेत. त्यातच आता औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे.तर काही कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. ( senior police officers infected corona positive ) नुकतीच औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची दफ्तर तपासणी झाली. त्यानंतर आता औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर एका अधिकाऱ्यांना ताप आला आहे. सर्व अधिकाऱ्यांना कोणतेही लक्षण नसून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस कर्मचारीही पॉझिटिव्ह... औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली असतानाच काही कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट सुध्दा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडाली असून, पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. (Aurangabad news today senior police officers infected corona positive ) (Aurangabad news today senior police officers infected corona positive )


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zc8ryw

No comments