Header Ads

ad

corona in dharavi: धारावीकरांसाठी आनंदाची बातमी! ३१ दिवसांंनंतर आज एकही नवा रुग्ण नाही

मुंबई: मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीकरांसाठी आज मोठा दिलासा देणारे वृत्त आहे. करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच आज धारावीत एकही बाधित रुग्णाचे निदान झालेले नाही. (covid news mumbai dharavi records zero new cases after 31 days) गेल्या वेळी २० डिसेंबर २०२१ या दिवशीही धारावीत एकही करोना बाधित रुग्ण आढललेला नव्हता. सध्या धारावीत एकूण ४३ सक्रिय रुग्ण असून ११ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ३२ रुग्ण एकतर घरात क्वारंटाईन आहेत किंवा मग संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. क्लिक करा आणि वाचा- मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये एका दिवसात कोविडची शून्य प्रकरणे नोंदवण्यास ३१ दिवस लागले होते. तर दुसऱ्या लाटेदरम्यान १४ जून २०२१ रोजी शून्य रुग्णसंख्येची नोंद होण्यासाठी ११९ दिवसांचा कालावधी लागला होता. तर पहिल्या लाटेदरम्यान २० डिसेंबर २०२० रोजी शून्य रुग्णसंख्येची नोंद होण्यासाठी २६९ दिवसांचा कालावधी लागला होता. मुंबईत २७ डिसेंबरच्या आसपास तिसरी लाट सुरू झाल्यानंतर धारावीत २८ जानेवारीपर्यंत १ हजार ३८१ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेदरम्यान एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद १५० इतकी झाली होती. ही नोंद ७ जानेवारी २०२२ रोजी झाली होती. दुसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णसंख्येची तुलना करता ही संख्या खूपच जास्त आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या ९९ इतकी नोंदवली गेली होती. तर, पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या ९४ इतकी नोंदवली गेली होती. क्लिक करा आणि वाचा- पहिल्या लाटेदरम्यान कोविडच्या तीव्रतेचे बॅरोमीटर म्हणून उदयास आले होते. बीएमसी अधिकार्‍यांना हा भीती वाटत होती की, धारावीतील दाट वस्त्यांमध्ये करोनाचा संसर्ग खूप वेगाने पसरेल आणि त्याच्याशी दोन हात करणे आरोग्य यंत्रणेला त्याला तोंड देणे कठीण जाईल. तबलीगी जमातीच्या सदस्यांना डॉ. बालिगा नगर येथील एका फ्लॅटमध्ये ठेवणारे ५६ वर्षीय गारमेंट युनिट मालक हे धारावीतील पहिले रुग्ण होते. १ एप्रिल २०२० रोजी त्यांचे निधन झाले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HbJOFk

No comments