Header Ads

ad

omicron updates: चिंताजनक! राज्यात आज ओमिक्रॉनचे ५० नवे रुग्ण; पुण्यात सर्वाधिक नोंद

मुंबई: राज्यात करोनाच्या () वाढत्या संसर्गामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून ओमिक्रॉनच्या (omicron) रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. आज राज्यात ११ हजार ८७७ नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे चिंतेत भर पडलेली असतानाच, आज ओमिक्रॉनचे ५० नवे रुग्ण आढळले आहेत. यांपैकी सर्वांधिक रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. पुण्यात आढळलेल्या रुग्णांची संख्या ३६ इतकी आहे. ( update about 50 new patients were found in the state today) पुण्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ८ नवे रुग्ण आढळले असून, पुणे ग्रामीण भागात २, सांगलीत २, मुंबईत आणि ठाण्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५१० रुग्णांचे रिपोर्ट आले आहेत. क्लिक करा आणि वाचा- एकूण ५१० ओमिक्रॉन रुग्णांपैकी मुंबईत आतापर्यंत ३२८ रुग्ण आढळले असून, पुणे मनपा क्षेत्रात ४९, पिंपरी चिंचवडमध्ये ३६, पुणे ग्रामीणमध्ये २३, ठाणे मनपात १३, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये प्रत्येकी ८, कल्याण डोंबिवलीत ७, नागपूर आणि साताऱ्यात प्रत्येकी ६, उस्मानाबादमध्ये ५, वसई विरारमध्ये ४, नांदेडमध्ये ३, औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगलीत प्रत्येकी २ आणि लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापुरात प्रत्येकी १ रुग्ण आढळलेला आहे. क्लिक करा आणि वाचा- यांपैकी एकूण २६ रुग्ण हे इतर राज्यांमधील, तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा- या रुग्णांपैकी १९३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HodjDm

No comments