Anil Deshmukh Vs Param Bir Singh: अनिल देशमुख यांचा परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप; सिंह यांनीही केले आरोप
मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त () हेच अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरण (Mansukh Hiren) हत्याकांडाचा मुख्य मास्टरमाइंड असल्याचे माजी गृहमंत्री (Anil Deshmukh) यांनी ईडीला सांगितले. परमबीर सिंह यांनी पुरावे नष्ट करण्याचे काम केले असून त्यांनी खोटी माहितीही दिली असल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी जेव्हा सिंह यांना विधान भवनात बोलावण्यात आले, त्यावेळी त्यांनी योग्य माहिती दिली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी परमबीर सिंह यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची नियुक्ती होमगार्डच्या महासंचालनपदी केली, अशी माहितीही देशमुख यांनी ईडीला दिली आहे. ( makes serious allegations against parambir singh and singh also made allegations on deshmukh) क्लिक करा आणि वाचा- परमबीर सिंह यांचेही देशमुख यांच्यावर गंभीर आरोप दरम्यान, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देखील आपला जबाब ईडीपुढे नोंदवला. यावेळी सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावले. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यावर दबाव टाकून त्यांचा जबाब बदण्यास सांगितले, असा जबाब परमबीर सिंह यांनी नोंदवला. तुरुंगात सचिन वाझे यांचा आपला जबाब बदलावा यासाठी छळ करण्यात येत आहे, असेही सिंह यांनी म्हटले आहे. तुरुंगात सचिन वाझे यांचे कपडे काढले जातात आणि त्यांची चौकशी केली जाते असेही सिंह यांनी सांगितले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआय आणि या प्रकरणाची चौकशी करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DhBW1ms2p
Post a Comment