Header Ads

ad

पदोन्नती मिळाल्यानंतर एसीबीचे पोलीस निरीक्षक दोन दिवसांपासून बेपत्ता

जालना: येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे बेपत्ता झाले आहेत. २ फेब्रुवारी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळं जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संग्राम ताटे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहरातील यशवंतनगर भागातील राहत्या घरून मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे पत्नीस सांगून घराबाहेर पडले होते. घराबाहेर जाताना त्यांनी कोणतेही वाहन, मोबाईल फोन आणि खिशातील पाकीट, घड्याळदेखील सोबत नेलेले नाही. दरम्यान ताटे हे दोन दिवसांपासून घरी न परतल्यानं त्यांच्या पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली असून पोलीसांनी त्यांची शोधाशोध सुरु केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील शोधमोहीम सुरू केली आहे व बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले असल्याचे कळते आहे.संग्राम ताटे यांचा गेल्या दोन दिवसांपासून कोणाशी संपर्कही झालेला नाही. वाचाः याबाबत माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे हे गुरुवारी दिवसभर जालना शहरात ठाण मांडून होते. एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे व बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. दोन दिवसांपासून त्यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. वाचाः यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंगची गुरुवारी रात्री उशिरा पत्नीच्या तक्रारीवरून नोंद करण्यात आली आहे श्री. ताटे यांना बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली झाली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pRSEHgG

No comments