Header Ads

ad

संजय दत्त यांच्यासह तिघांवर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; दत्त यांनी आरोप फेटाळले

डोंबिवली: गॅस सिलिंडर वितरणाचे काम करणाऱ्या दीपक निकाळजे या २७ वर्षीय तरुणाला धमकी देऊन मारहाण केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार आणि अन्य तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुला घरातून उचलून घेऊन जाईन. तू माझे भीषण रूप पाहिलेले नाहीस. मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी धमकी दत्त यांनी मोबाइलवरून दिल्याची आणि दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची तक्रार निकाळजे याने केली. (former congress mla and three others have been charged with assault dutt denied the allegations) क्लिक करा आणि वाचा- हा मारहाणीचा प्रकार रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळू वंजारी हे पुढील करत आहे. क्लिक करा आणि वाचा- दत्त यांनी आरोप फेटाळले दरम्यान, माजी आमदार दत्त यांनी निकाळजे याचे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. निकाळजे गैस सिलिंडरकरिता जादा पैसे उकळत असल्याबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. यामुळे आमच्या एजन्सीची बदनामी होत होती. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले आहे. परंतु तो आता आमच्या अन्य कामगारांना काम करू नका, अशी दमदाटी करु लागला. त्याबाबत त्याला समजावले असता त्याने खोटी तक्रार दिल्याचे दत्त म्हणाले, २०२१ मध्येही मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BU0mX14

No comments