coronavirus update: करोना नियंत्रणात असला तरी दुर्लक्ष नको; 'अशी' आहे राज्यातील ताजी स्थिती!
मुंबई: राज्यात करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत असली तरी कालच्या तुलनेत आज दैनंदिन रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. मात्र, दैनंदिन रुग्णसंख्यावाढ नियंत्रणात असून मृत्यूसंख्येत घट झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात १ हजार १८२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २ हजार ५१६ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरच राज्यात आज एकूण १० हजार २५० रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. (maharashtra registered 1182 new cases in a day with 2516 patients recovered and 19 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ०४ हजार ७३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९९ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ७५ लाख ७४ हजार ७७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ६२ हजार ६५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.१४ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ५६ हजार ९२० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ६७५ इतकी आहे. मुंबईत आज ११९ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज गुरुवारी ११९ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या १० लाख ५५ हजार १६१ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एका करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ६९१ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण ६६ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज गुरुवारी ६६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात ०९, ठाणे महापालिका क्षेत्रात २२, नवी मुंबई मनपा क्षेत्रात १९, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ०६, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात ०३, भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात ०, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात ०७ रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा- तर, पालघरमध्ये आज ०३ रुग्ण आढळले असून, वसई विरार मनपा क्षेत्रात ०१, रायगडमध्ये १२ आणि पनवेल मनपा क्षेत्रात १५ नवे रुग्ण आढळले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oNPYSLH
Post a Comment