Header Ads

ad

firing in mulind: मुलुंड परिसरात गोळीबार; पोलिस आणि आरोपींमध्ये झाली झटापट

म. टा. खास. प्रतिनिधी, मुंबई मुंबई अहमदाबाद मार्गावर सुमारे एक कोटीच्या सुपारी असलेला कंटेनर पळविणाऱ्या दरोडखोरांच्या टोळीला मुलुंड आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी मुंलुड येथून अटक केली. या कारवाईदरम्यान दरोडेखारांनी केलेला हल्ला परतावून लावण्यासाठी पोलिसांना हवेत करावा लागला. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. ( firing reported at in ) क्लिक करा आणि वाचा- मॅंगलोरहून गुजरातच्या दिशेने सुपारी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अडवून १८ फेब्रुवारीला मध्यरात्री सहा जणांनी कंटेनर घेऊन पळ काढला. चोरी करण्यात कंटेनर आणि सुपारी मुलुंड येथील एका गोदामात लपवून ठेवला असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी या दरोडखोरांना पकडण्यासाठी मुलुंड पोलिसांची मदत घेतली. क्लिक करा आणि वाचा- मुलुंड काॅलनीमधील साईबाबा मंदिराच्या मागील मैदानात असलेल्या गोदामामध्ये सुपारी ठेवण्यात आली होती. याच गोदामात पोलिसांनी छापा टाकला असता दरोडखोरांना चाकू, तलवारीने पोलिसांवर हल्ला केला. हा हल्ला परतावून लावण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. दरोडखोरांना चोख प्रत्युत्तर देत पोलिसांनी तिघांना अटक केली. या तिघांवर २५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VycW1NI

No comments