Header Ads

ad

Nawab Malik Arrested: मलिकांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही: भुजबळ

मुंबई: ईडीने अटक केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झालेली असली तरी त्यांचा न्यायदेवतेपुढे गु्न्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर भुजबळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी उद्यापासून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसतर्फे आंदोलन पुकारण्यात आल्याचेही भुजबळ यांनी जाहीर केले आहे. (minister has said that crime of has not been proved so there is no question of his resignation) अल्पसंख्याक मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर छगन भुजबळ प्रसारमध्यमांशी बोलत होते. नवाब मलिक याना झालेली अटक दुर्देवी आहे. हे प्रकरण पीएमएले कायदा अस्तित्वात नव्हता तेव्हाचे आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री केंद्र सरकार आणि भाजपच्या विरोधात बोलतात म्हणून हे ३० वर्षांपूर्वीचे प्रकरण आता बाहेर काढण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- उद्या आघाडीच्या मंत्र्यांचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अटक प्रकरणावर कायदेशीररित्या चर्चा करण्यात आली. या प्रकरणावर आता जनतेत जाऊन मुकाबला करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच उद्या सकाळी १० वाजचा मंत्रालयाजवळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी आघाडीचे सर्व मंत्री, आमदार धरणे आंदोलन करणार असल्याचेही भुजबळ यांनी जाहीर केले. तसेच परवापासून तिन्ही पक्ष शांततेच्या मार्गाने तालुका आणि जिल्हा पातळीवर मोर्चे, धरणे आंदोलन करणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'राणेंना अटक झाली तेव्हा कुठे राजीनामा घेतला होता?' नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही असे सांगताना भुजबळ म्हणाले की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही अटक झाली होती. मात्र त्यावेळी त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. महाविकास आघाडीचे मंत्री केंद्र सरकारविरोधात बोलत असतात त्यामुळे एकेका मंत्र्याला कोंडीत पकडून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SUYpz0v

No comments