nawab malik: नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार?; चांदीवाल आयोगाने बजावले समन्स
मुंबई: सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) या घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोटके सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर या प्रकरणात नवनवी माहिती उघड होत गेली. यामध्ये सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांचीही नावे समोर आली आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांनी या स्फोटके प्रकरणात वाझे आणि परमबीर सिंग यांची नावे घेतली होती. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात नवाब मलिक यांना न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल आयोगाने समन्स बजावले आहे. ( issues summons to minority development minister regarding ) चांदीवाल आयोगाने नवाब मलिक यांना १७ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे यांनी आयोगासमोर एक लेख सादर केला. या लेखात त्यांनी नवाब मलिक यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यामागे परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचा हात होता, असे मलिक यांचे म्हणणे लेखात छापण्यात आले होते. क्लिक करा आणि वाचा- सचिन वाझे यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले असून, अशा निराधार आरोपामुळे आपली प्रतिमा मलिन केली जात असल्याचे आपल्या जबाबात वाझे यांनी म्हटले आहे. आता नवाब मलिक यांनी अँटिलिया स्फोटके प्रकरणी सचिन वाझे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. क्लिक करा आणि वाचा- गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया या इमारतीजवळ एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके आढळून आली होती. या गाडीमध्ये २० जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे एक पत्रही सापडल्याने खळबळ उडाली होती. पुढे ५ मार्च रोजी या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले होते. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TrdbStl
Post a Comment