Header Ads

ad

'कोण एमआयएम?, कुठून उपटला माहीत नाही'; मंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला टोला

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयएमला टोला लगावला आहे. कोण एमआयएम कुठून उपटला माहित नाही, असे वक्तव्य मंत्री शिंदे यानी केले आहे. आघाडीसोबत येण्याच्या एमआयएमच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाण्यातील किसननगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला मंत्री शिंदे उपस्थित होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MPpEq9a

No comments