मोहदरी घाटात खासगी बस आगीत भस्मसात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवासी
श्रीहरी कुलकर्णी, रा. म्हसरुळ, नाशिक हे खासगी लक्झरी बस नाशिकहून कोल्हापुरकडे ३० ते ३५ भाविकांना घेऊन जात होते. नाशिकहून निघालेली बस रात्री पावणे दहाच्या सुमारास मोहदरी घाटात पोहोचली. बसला आग लागल्याचे चालक कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना व अग्निशमन दलास माहिती दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/D1gEJXl
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/D1gEJXl
Post a Comment