संभाजीराजेंना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवलं, सकल मराठा समाजाची उद्या तुळजापूर बंदची हाक
Tuljapur Bandh : राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्यात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. तुळजापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा पाहायला मिळाली. संभाजीराजेंना अशा प्रकारची वागणूक दिल्याप्रकरणी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी सकल मराठा समाजाकडून उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. समस्त तुळजापूरकर आणि सकल मराठा समाजाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VTJUwby
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VTJUwby
Post a Comment