धक्कादायक! मैत्रिणीला घेऊन जंगलात जाणे जीवावर बेतले; युवकावर वाघाचा हल्ला
मृतक युवक अजित सोमेश्वर नाकाडे हा आपल्या मैत्रीणीसोबत दुचाकीने उसेगाव जंगल परिसरात फिरायला गेला होता. हे दोघे जगलाच्या आतील भागात पोहोचले. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर अचानक हल्ला केला. त्यानंतर वाघाने या युवकाला जंगलात फरफटत नेले अशी माहिती मृतक युवकासोबत असलेल्या मुलीने लोकांना दिली. जवळपास दोन तासापर्यंत शोध मोहीम राबविल्यानंतर युवकाचा मृतदेह आढळून आला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KVHtMNW
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KVHtMNW
Post a Comment