Header Ads

ad

मिरजेतील फार्म हाऊसवर छापा; लाखो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

मिरज पूर्व भागातील वड्डी येथील एका फार्म हाऊसवर पुणे सीमा शुल्क विभागाने छापा टाकून अमली पदार्थाचा साठा हस्तगत केल्याची समोर येत आहे. मात्र या कारवाईबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मिरजेतील एका ग्रुपच्या फार्म हाऊसवर सांगली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने पुणे विभागीय केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा टाकून अमली पदार्थांचा साठा जप्त केला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yjFKG0O

No comments