Header Ads

ad

महाराष्ट्राच्या 'खली'ला मदतीची गरज, आ. रमेश वांजळेंच्या बॉडीगार्डसाठी वसंत मोरेंची पोस्ट

अंगावर अडीच किलोच्या सोन्याच्या दागिन्यांमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत हरएक माणसासमोर रमेश वांजळे यांचं केवळ नावच नव्हे तर नजरेसमोर करारी बाण्याचा 'सोनेरी माणूस' उभा राहायचा. पण त्याचबरोबर त्यांची सावली म्हणून वावरणारे त्यांचे अंगरक्षक उमेश वसवे हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित होते. तब्बल ७ फूट उंची आणि १६५ किलो वजन असलेले उमेश वसवे महाराष्ट्राचे 'खली' म्हणून प्रसिद्ध होते. अशी प्रचंड शरीर संपत्ती लाभलेले उमेश गेल्या २ वर्षांपासून आजाराशी झगडत आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VzuN6UQ

No comments