श्रीक्षेत्र देहूचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी राहणार बंद; १४ जूनला शिळा मंदिराचे लोकार्पण
देहू संस्थांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून देहू संस्थान तशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यावर उद्याच अमंलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान देहू नगरीत येत असल्याने देहूकरांसाठी हा आनंद वेगळा असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या आगमनाची देहूकर वाट पहात असल्याचे पहायला मिळत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HqCPjlW
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HqCPjlW
Post a Comment