Header Ads

ad

रेशन तांदळाचा काळाबाजार करणारा ट्रक पोलिसांनी सोडून दिला; झाली कठोर कारवाई

गेल्या दीड महिन्यापूर्वी खदान पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी अकोला शहरातील चांदूर फाटा येथे एक ट्रक पकडला. या ट्रकमध्ये काळाबाजारातील रेशनचा तांदुळ असल्याचे समजते, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता परस्पर हा ट्रक आणि वाहन चालकांना सोडून देण्यात आले. या दरम्यान, या चौघांनी ट्रक मालकाकडून त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये घेण्यात आलेत. त्यानंतर प्रकरण शांत झाले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OwfocrC

No comments