'आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार'; शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना
सोमवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी खडसे यांच्या समर्थनार्थ शनिवारी रात्री जळगावातील शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना झाले. आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार आहे. विधानभवनात शेतकऱ्यांसह सर्व प्रश्नाला वाचा फोडणार आहे. त्यामुळे या नेत्याचा सच्चा कार्यकर्ता याचा मोठा आनंद आहे. त्यामुळे सर्व कामे सोडून या नेत्याच्या समर्थनार्थ मुंबईला जात असल्याचे भुसावळातील कार्यकर्ते नागो पाटील यांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GqJyhOc
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GqJyhOc
Post a Comment