धक्कादायक! निवृत्त पोलिसाची रिव्हॉल्व्हर काडतुसांसह चोरीला
कुर्ला पूर्व कामगार नगर येथील बंगला क्रमांक २० या ठिकाणी दिगंबर काळे (६६) हे सेवानिवृत्त सहायक आयुक्त कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काळे हे २३ एप्रिल रोजी कुटुंबासह गावी गेले होते, मंगळवारी ते गावाहून परत आले असता त्यांच्या बंगल्याच्या स्वयंपाक घराच्या ग्रील तुटलेली दिसली. त्यांनी घरात जावून पाहिले असता रोख ४० हजार रूपये, सोन्याचे चांदीचे दागिने आणि त्यांची परवाना असलेली ३२ बोअर ची रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे चोरीला गेल्याचे दिसून आले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qDlkXoG
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qDlkXoG
Post a Comment