दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण, ३१ हजार महिलांची उपस्थिती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/o6QUNIS
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/o6QUNIS
Post a Comment